pexels-sonika-agarwal-17983773

श्रीगणेशवरदस्तोत्र

॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ नमोजी श्रीगणेशा । ॐ नमोजी बुद्धिप्रकाशा ॥ ॐ नमोजी गुणेशा | सिद्धिदायका तुज नमो ॥ १ ॥

ॐ नमोजी ॐकारा । ॐ नमोजी चराचरा ॥ ॐ नमोजी गणेश्वरा । गणपालनतत्परा तुज नमो ॥ २ ॥

ॐ नमो वागेश्वरी । ॐ नमो ब्रह्मकुमारी ॥ ॐ नमो वाचा चारी । सर्वसत्ताधारी तुज नमो ॥ ३ ॥

ॐ नमो सद्गुरु राजा । ॐ नमो अधोक्षजा ॥ ॐ नमो कैलासराजा । शंभुदेवा तुज नमो ॥ ४ ॥

ॐ ॥ नमो दत्तात्रेया । ॐ नमो अत्रि अनुसूया ॥ ॐ नमो स्वामी सखया । रामराया तुज नमो ॥५॥

ॐ नमो सकल संता । सिद्धसाधु आणि महंता ॥ ॐ नमो प्राणनाथा । श्रीहनुमंता तुज नमो ॥ ६ ॥

ॐ नमो इष्टदेवा । ॐ नमो मोक्षदेवा ॥ ॐ नमो कुलदेवा । कालदेवा तुज नमो ॥ ७ ॥

ॐ नमो वास्तुदेवा । ॐ नमो ग्रामदेवा । ॐ नमो मातृदेवा । पितृदेवा तुज नमो ॥ ८ ॥

श्री अष्टोत्तर शतमाला । करायाची आज्ञा मला ॥ देऊनी बुद्धि बालकाला । वरद स्तोत्र घडवावे ॥ ९ ॥

ॐ नमो गणेश्वरा। ॐ नमो गतीश्वरा ॥ ॐ नको गजवरा । गुणगर्वधरा तुज नमो ।। १० ।।

ॐ नमो गणेशा । ॐ नमो गणाध्यक्षा ॥ ॐ नमो गुरुदृशा। गुरुपुरुषा तुज नमो ॥ ११ ॥

ॐ नमो गुणेश्वराः। ॐ नमो गानचतुरा । ॐ नमो गानपरा। गजरूपधरा तुज नमो ॥ १२ ॥

ॐ नमो गुरुधर्म धुरंधरा । ॐ नमो गुणवत् पोषणकरा ॥ ॐ नमो गणपालनतत्परा। गजासुरयोद्धारा तुज नमो ॥ १३ ॥

ॐ नमो गंधर्वसंशयच्छेत्रा। ॐ नमो गुरुमंत्रगुरुतंत्रा ॥ ॐ नमो गुह्यप्रवरा । गुरुगर्वहरा तुज नमो ॥ १४ ॥

ॐ नमो गणस्वामिना । ॐ नमो गजानना ॥ ॐ नमो गुणसंपन्ना। गानप्राणा तुज नमो ॥ १५ ॥

ॐ नमो गणदुःखप्रणाशना । ॐ नमो गुणवत् शत्रुसूदना ॥ ॐ नमो गजध्वना । हे गुणप्राणा तुज नमो ॥ १६ ॥

ॐ नमो गानज्ञानपरायणा । ॐ नमो देवगौणा ॥ ॐ नमो गानध्यानपरायणा । गानभूषणा तुज नमो ।। १७ ।।

ॐ नमो गुरुप्राणा । ॐ नमो गुरुगुणा ॥ ॐ नमो गंधर्वभाजना | गणप्रथितनाम्ना तुज नमो ।। १८ ।।

ॐ नमो गुरुलक्षणसंपन्ना । ॐ नमो गंधर्ववरदर्पघ्ना ॥ ॐ नमो गंधर्व प्रीतिवर्धना । गुरुतत्त्वार्थदर्शना तुज नमो ।। १९ ।।

ॐ नमो गुणाराध्या । ॐ नमो गुणाहृद्या ॥ ॐ नमो गुरु आद्या | गुण आद्या तुज नमो ।। २० ।।

ॐ नमो गुरु शास्त्रालया । ॐ नमो गुरुप्रिया ॥ ॐ नमो गणप्रिया । गणंजया तुज नमो ॥ २१ ॥

ॐ नमो गंधर्वप्रिया । ॐ नमो गकारबीजनिलया ।। ॐ नमो गुरुश्रिया । गुरुमाया तुज नमो ।। २२ ।।

ॐ नमो गजमाया । ॐ नमो गंधर्वसंसेव्या ॥ ॐ नमो गंधर्वगानश्रवणप्रणया । गंधर्वस्त्री-भिराराध्या ॥ तुज नमो ॥ २३ ॥

ॐ नमो गणनाथा । ॐ नमो गणगर्भस्था ॥ ॐ नमो गुणीगीता । गुरुस्तुता तुज नमो ।। २४ ।।

ॐ नमो गणरक्षणकर्ता । ॐ नमो गणनमस्कृता । ॐ नमो गुणवत् गुणचित्तस्था । गुरुदैवता तुज नमो ।। २५ ।।

ॐ नमो गंधर्व कुलदेवता । ॐ नमो गजदंता ॥ ॐ नमो गुरुदैवता गंधर्वप्रवणस्वांता तुज नमो ॥ २६ ॥

ॐ नमो गजदंता । ॐ नमो गुरुदैवता । गंधर्वगीतपरिता । ॐ नमो नमो गानकृता । हे गर्जता तुज नमो ॥ २७ ॥

ॐ नमो गणाधीरजा । ॐ नमो देव गजा ॥ ॐ नमो गुरुभुजा । देव गजराजा तुज नमो ॥ २८ ॥

ॐ नमो गुरुमूर्ती । ॐ नमो गुणाकृती ॥ ॐ नमो गजपती। गणवल्लभमूर्ती तुज नमो ॥२९ ॥

ॐ नमो गणपती । ॐ नमो गुरुकीर्ती ॥ ॐ नमो गीर्वाणसंपत्ती । गीर्वाणगणसेविती तुज नमो ॥ ३० ॥

ॐ नमो गुरुत्राता । ॐ नमो गणाध्याता ॥ ॐ नमो गणत्राता । गणगर्वपरिहर्ता तुज नमो ॥ ३१ ॥

ॐ नमो गणदेवा । ॐ नमो मानभुवा ॥ ॐ नमो गंधर्वा । गानसिंधवा तुज नमो ॥ ३२ ॥

ॐ नमो गणश्रेष्ठा । ॐ नमो गुरुश्रेष्ठा ॥ ॐ नमो गुणश्रेष्ठा । गणगर्जितसंतुष्टा तुज नमो ॥ ३३ ॥

ॐ नमो गणसौख्यप्रदा । ॐ नमो गुरुमानग्रदा ॥ ॐ नमो गुणवत् सिद्धिदा । गानविशारदा तुज नमो ॥ ३४ ॥

ॐ नमो गुरुमंत्रफलप्रदा । ॐ नमो गुरुसंसारसुखदा । ॐ नमो गुरुसंसारदुःखभिदा । गर्विगर्वनुदा तुज नमो ॥ ३५ ।।

ॐ नमो गंधर्वाभयदा । ॐ नमो गणश्रीदा ॥ ॐ नमो गर्जन्नागयुद्धविशारदा । गानविशारदा तुज नमो |॥३६ ॥

ॐ नमो गंधर्वभयहारका । ॐ नमो प्रीतिपालका ॥ ॐ नमो गणनायका । गंधर्ववरदायका तुज नमो ।।३७ ।।

ॐ नमो गुरुस्त्रीगमने दोषहरका । ॐ नमो गंधर्वसंरक्षका ॥ ॐ नमो नमो गुणज्ञा गंधका। गंधर्वप्रणयोत्सुका तुज नमो ॥ ३८ ॥

ॐ नमो गंभीरलोचना । ॐ नमो गंभीर गुणसंपन्ना ॥ ॐ नमो गंभीरगति शोभना । देव गजानना तुज नमो ॥ ३९ ॥

हे गणेशस्तोत्र पठण करता । देही नांदे आरोग्यतां ॥ कार्यसिद्धी होय तत्त्वतां । संशय मनीं न धरावा ॥४० ॥

धनार्थियानें एकवीस दिन । सुप्रभाती उठोन ॥ करिता स्तोत्र पठन । धनप्राप्ती होय त्यासी ॥४१ ॥

जो प्रतिदिन त्रिवार पठत। त्यासी पुत्रधनधान्य प्राप्त होत ॥ श्रीगणेश पुरवी इच्छित । यदर्थी संशय न धरावा ॥४२ ॥

ज्यावरी संकट दुर्धर । तयाने एकादशवेळ स्तोत्र ॥ पठता थोर त्याचे भय । तात्काळ निरसेल ||४३ ॥

त्र्यंबकराय गणेशभक्त । जनदुःखें कष्टी होत ॥ होउनीया कृपावंत । स्तोत्रबीजयुक्त करविती ॥४४ ।।

गणेशसुत नारायण । केवळ मूढ अज्ञान ॥ त्यास कैसे असे ज्ञान । वरदस्तोत्र करावया ॥ ४५ ॥

कलियुगीं नाम वरिष्ठ । साक्ष देती श्रेष्ठ श्रेष्ठ ॥ म्हणोनिया स्तोत्र पाठ । संत महंत करिताती ॥४६॥

हे स्तोत्र केवळ चिंतामणि । नामरत्नांची खाणी ॥ स्तोत्र पठोनिया वाणी । साधकें शुद्ध करावी ॥ ४७ ॥

स्तोत्र पठणें पुरुषार्थ चारी | साध्यहोती घरचे घरी ॥ म्हणोनिया याचे वरी । शुद्ध भाव ठेवावा ॥४८ ॥

अति सात्त्विक पुण्यवंत । त्यासीच येथे प्रेम उपजत ॥ भावे करिती स्तोत्रपाठ। त्यासी गणेश संरक्षी ॥४९ ॥

शके अठराशे साठ । बहुधान्य संवत्सर श्रेष्ठ || श्रीविनायकी चतुर्थी येत । शुक्रवार दिन भाग्याचा ॥ ५० ॥

येच दिनी हे वरदस्तोत्र | पूर्ण झाले अतिपवित्र || वरदहस्ते गजवक्त्र । पठणें भक्तां सांभाळी ॥५१ ॥

इति श्री गणेशवरदस्तोत्र । श्रवणें होती कर्ण पवित्र ॥ विजय होईल सर्वत्र । आणि शांती लाभेल ॥५२ ॥

श्रीगजाननार्पणमस्तु । ॐ शांतिः शांति: शांतिः ॥

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *